राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली ही भावना

0

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांनी मुंबईतील गुढीपाडवा मेळाव्यात जाहीर केलेल्या भूमिकेनंतर त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. आपण सारे मिळून निश्चितच जनतेच्या आशाअ ाकांक्षांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण ताकदीनिशी संकल्पबद्ध होऊ या, असे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

राज ठाकरे यांचा अत्यंत आभारी
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून राज ठाकरे यांच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. सस्नेह स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल नेतृत्त्वावर विश्वास ठेवत, विकसीत भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी, भक्कम महाराष्ट्राच्या उभारणीसाठी, भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी मनसेचे प्रमुख राज ठाकरे जी यांचा अत्यंत आभारी आहे. आपण सारे मिळून निश्चितच जनतेच्या आशाआकांक्षांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण ताकदीनिशी संकल्पबद्ध होऊ या, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आशिष शेलार काय म्हणाले?
भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनीही राज ठाकरे यांच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. हिंदुत्वासाठी आणि विकसित भारतासाठी मोदींच्या परिवाराला बिनशर्त पाठिंबा देणार्‍या राज ठाकरे यांचे आभार. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमाणे विचारांची तडफदार भूमिका आज महाराष्ट्राने पाहिली. सकाळी ऐकले ते ‘नकली’ आणि संध्याकाळी महाराष्ट्राने पाहिले ते ‘असली’, असे म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.


कॉपी करू नका.