माजी आमदार संतोष चौधरींचे बंड शमले : म्हणाले ; आता श्रीराम पाटील यांना निवडून आणणार !

0

Former MLA Santosh Choudhary’s revolt was suppressed: He said that he will elect Shriram Patil now! जामनेर : राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्याविरोधात षड्डू ठोकत बंड केले होते त्यामुळे रावेर लोकसभेत बंडखोरी होण्याची भीती होती. राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवार यांनी दिलेल्या शब्दानंतर चौधरींचे बंड आता क्षमले (थांबले) आहे. जामनेरात रविवार, 21 एप्रिल रोजी झालेल्या मेळाव्यात त्यांनी श्रीराम पाटील यांना निवडून आणण्याचा निर्धार केला. दादागिरी करणार्‍यांना दादागिरीनेच उत्तर देणार असल्याचे ते म्हणाले.

जीवाचे रान करणार मात्र श्रीराम पाटलांना निवडून आणणार
आपल्या आक्रमक शैलीत चौधरी म्हणाले की, मी चार फार्म घेवून आलो म्हणून विविध चर्चा झाल्या मात्र ते फार्म मी शरद पवार पक्षाच्या नावाने आणले आहेत. मी जीवनात कधीही पवार साहेबांच्या शब्दाबाहेर जाणार नाही याची खात्री देतो. साहेबांना अनेक लोक सोडून गेले आहेत शिवाय आमच्यासोबत अनेकांनी दगा केला मात्र त्याचे उत्तर आम्ही योग्य वेळ आल्यावर देवू.

दादागिरीला चोख उत्तर देणार
माजी आमदार चौधरी म्हणाले की, साहेबांनी आणखी दोन सभा आम्हाला द्याव्यात. मनात खूप बॅगलॉक साचला आहे त्यामुळे आम्हाला भरपूर काही बोलायचे आहे. भुसावळ, मुक्ताईनगर, जामनेर मतदारसंघात ताकद दाखवून देवू, श्रीराम पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून लढू, जीवाचे रान करू व 13 मे पर्यंत झोपणार नाही, असा शब्दही त्यांनी दिला.

श्रीराम पाटील यांच्या बाजूने जनता-जनार्दन आहे. आपल्याला सोडून गेलेल्यांना जनताच आता त्यांची जागा दाखवेल, असेही ते म्हणाले. निवडणुकीपर्यंत दबाव येईल, दादागिरी करण्याचे प्रयत्न होतील मात्र जशास तसे उत्तर दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. आतापर्यंत आम्ही अनेक केसेस अंगावर घेतल्या मात्र दडपणाला आम्ही कधीही बळी पडणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
माजी कृषी मंत्री शरद पवार, माजी मंत्री सतीश पाटील, प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र भैय्या पाटील, शिवसेना नेते संजय सावंत, माजी खासदार ईश्वरलाल जैन, महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.


कॉपी करू नका.