भुसावळात महावीर जयंतीनिमित्त निघाली शोभायात्रा

0

A procession started on the occasion of Mahavir Jayanti in Bhusawal भुसावळ : शहरात भगवान महावीर जयंतीनिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी चौकापासून रविवारी सकाळी आठ वाजता शोभायात्रेला सुरूवात झाली. गांधी चौकातून शोभायात्रा निघाल्यानंतर सराफ बाजार, मरीमाता मंदीर, अप्सरा चौक, डीस्को टॉवर, ब्राम्हण संघापासून जामनेर रोडने प्रोफ्रेसर कॉलनीतील भगवान शीतलनाथ श्वेतांबर जैन मंदिरात शोभायात्रेचा समारोप झाला. शोभायात्रेत गायकांतर्फे भक्तीगीते सादरर करण्यात आली.

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
रविवारी सकाळी 11 ते 2 यावेळात महाप्रसादाचे आयोजन संतोषी माता हॉलमध्ये करण्यात आले. रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता महावीर स्वामी पाळना तसेच संध्याकाळी 7 ते 10 या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम झाले. महोत्सव समितीचे अध्यक्ष सुमित चोरडीया, उपाध्यक्ष प्रशांत बजाज, राजेश गेलडा, कोषाध्यक्ष देवेंद्र मेहता, संजय चोरडीया व जितेश अवतारे, राजेश सुराणा यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आठवडे बाजारातील जैन मंदिर व मातृभूमी चौकातील श्री 1008 भगवान शीतलनाथ श्वेतांबर जैन मंदिरात मूर्तीला अभिषेक व पूजा, आरती करण्यात आली. रविवारी सकाळी सात वाजता दोन्ही मंदिरांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले व सकाळी 11 वाजता मंगलाचरण झाले.

यशस्वीतेसाठी यांचे परिश्रम
यशस्वीतेसाठी अध्यक्ष सुमित चोरडिया, उपाध्यक्ष प्रशांत बजाज, राजेश गेलडा, कोषाध्यक्ष देवेंद्रजी मेहता, संजय चोरडीया, जितेश अवतारे यांच्यासह जे.बी. कोटेचा, सतीश साखरे, चेतन जैन हेमावत, गौतम चोरडिया, अजय कासलीवाल, रमेश अन्नदाते, दीपक काठे, प्रदीप गोसावी, महेंद्र कासलीवाल, भूषण चोरडिया, समकित सिसोदिया, गजेंद्र रूईकर, सतीश गोसावी, अल्केश झांबड, कांतीलाल चोरडिया, संजय कोटेचा, योगेश वासकर, शुभम ललवाणी, अमोल वासकर, देवेंद्र निमाणी, राजेश बाफना, अभय सुराणा, विजय अंबेकर, सतीश सोनसले आदींनी परिश्रम घेतले.


कॉपी करू नका.