शिरसाळा मारोतीचे आता सिद्धेश्वर हनुमानजी नामकरण

0

बोदवड : भाविकांच्या नवसाला पावणारा मारोती म्हणून ख्याती असलेल्या बोदवड तालुक्यातील शिरसाळा मारोतीचे आता सिद्धेश्वर हनुमानजी असे नामकरण करण्यात आले आहे. बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथे 16 एप्रिलपासून श्रीराम कथा सुरू आहे. महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज या कथेचे गायन करीत आहेत. यापूर्वी शिरसाळा गावाच्या नावावरून मारोतीरायाचे नाव घेतले जात होते मात्र श्रीराम कथेच्या पाचव्या दिवशी श्री हनुमंतरायाचे नामकरण करण्यात आले. जनार्दन हरीजी महाराज, सर्व विश्वस्त व भाविकांच्या साक्षीने आज शनिवारी शिरसाळा मारुतीचे नामकरण सिद्धेश्वर हनुमानजी असे करण्यात आले. शिरसाळा मारुतीची स्थापना समर्थ रामदास स्वामी यांनी केली आहे. हे ठिकाण सिद्ध जागृत व नवसाला पावणारे असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.

नामकरणानंतर भाविकांचा जयघोष
शिरसाळा येथील मारोतीरायाचे सिद्धेश्वर हनुमानजी नामकरण करताच भाविकांनी एकच जयघोष केला. सर्व भक्तांनी श्रीरामचंद्र व सिद्धेश्वर हनुमानाच्या नावाचा गजर केला. प्रसंगी आयोजित रक्तदान शिबिरात 26 दात्यांनी रक्तदान केले. या शिबिरात डॉ.प्रशांत सोनवणे, कांचन नेहते, संदीप बेंडाळे, नितीन इंगळे, सोनाली धनगर यांनी रक्त संकलन केले.


कॉपी करू नका.