शैक्षणिक कर्जासाठी टाळाटाळ : भुसावळातील बँकेला अर्जावर विचार करण्याचे निर्देश

व्यथीत झालेल्या विद्यार्थिनी व पालकांनी दिला लढा

0

Refusal for Education Loans: Banks in Bhusawal directed to consider application भुसावळ :  शैक्षणिक कर्जासाठी नकार देणार्‍या युनियन बँकेला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दणका देत विद्यार्थीनीला दिलासा दिला आहे. विद्यार्थिनीच्या वडीलांचा क्रेडिट इतिहास प्रतिकूल असल्याने कारण बँकेने दिले होते. कर्जदाराचा बँकेने कर्जासाठी दिलेला अर्ज नामंजूर केला होता. यावर खंडपीठाने संबधीत अर्जाचा कायदेशीर तरतुदीनुसार विचार करावा, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.

खंडपीठाच्या आदेशाचा दणका
भुसावळातील मूळ रहिवासी निदा अहमद अली सैय्यद (रा.रामदास वाडी, खडका रोड, भुसावळ) ही महिला विद्यार्थिनी जे.टी.महाजन इंजिनियरींग महाविद्यालयात बी.टेक.पदवीसाठी प्रवेशीत होती. विद्यार्थिनीने भुसावळच्या युनियन बँक ऑफ इंडियात दोन लाख 86 हजार 907 रुपये शैक्षणिक कर्जासाठी 25 फेब्रुवारी 2021 रोजी अर्ज केला मात्र बँकेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर विद्यार्थिनीच्या वडीलांनी 26 मार्च 2021 रोजी बँकेशी संपर्क करीत कर्ज मागणी केली. यावर बँकेने शैक्षणिक कर्ज निवेदन निकाली काढले. यानंतर शैक्षणिक कर्जासाठी 14 जून रोजी निदा अहमद यांनी बँकींग लोकपालकडे तक्रार दाखल केली.

यानंतर पुन्हा 10 ऑगस्ट रोजी 3 लाख 54 हजार रुपये कर्जासाठी अर्ज दाखल केला. बँकेने हा अर्जही नामंजूर केला. यानंतर पुन्हा 1 फेब्रुवारी रोजी तीन लाख 73 हजार रुपये विद्यार्थिनीचे वडील अहमद अली सैय्यद यांनी बँकेच्या सूचनेनुसार दाखल केला. मात्र यानंतर वडीलांचे क्रेडीट प्रतिकूल नसलाचे सांगून बँकेने हा अर्जही फेटाळला. या सर्व कालावधीत विद्यार्थिनीला एम.टेक.चा पुढील अभ्यासक्रम संदीप युनिव्हर्सिटी, नाशिक येथून खंडीत करावा लागला. यामुळे त्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी होऊन बँकेने कर्जाचा अर्ज मंजूर करण्यासाठी विचार करावा, असे निर्देश दिले आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड.बी.आर.केदार यांनी बाजू मांडली. त्यांना अ‍ॅड.राजेश एस.उपाध्याय यांनी सहकार्य केले.


कॉपी करू नका.