तत्कालीन तहसीलदार पंकज लोखंडे यांच्यावर गुन्हा दाखल करा

शासकिय महसूल बुडवल्याचा आरोप : माहिती अधिकार कार्यकर्ते केदार सानप यांची मागणी

0

File a case against the then Tehsildar Pankaj Lokhande भुसावळ : मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा येथे तत्कालीन तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय (महसूल) पंकज लोखंडे यांच्या कार्यकाळात गट नं. 167/पै/51 व गट नं. 167/पै/36 या वर्ग दोनच्या जागा कुठलाही शासकिय नजराणा न भरता तत्कालीन तहसीलदार पंकज लोखंडे यांनी आदेश क्र. जमीन/2/26/नअश/प्र.क.127/23-24 दि. 6-7-2023 व आदेश क्र. जमीन/2/26/नअश/प्र.क.118/23-24 दि. 5-7-2023 असे बोगस आदेश दिले आहेत. या आदेशावर अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन व तत्कालीन तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय (महसूल) पंकज लोखंडे यांची स्वाक्षरी आहे. याबाबत सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ वामन सानप यांनी अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्यासह विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे.

असे आहे नेमके प्रकरण
तत्कालीन तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय (महसूल) पंकज लोखंडे यांच्या कार्यकाळात मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा येथे गट नं. 167/पै/51 व गट नं. 167/पै/36 या वर्ग दोनच्या जागा कुठलाही शासकिय नजराणा न भरता वर्ग एकमध्ये वर्ग करून तत्कालीन तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय (महसूल) पंकज लोखंडे यांनी आदेश क्र. जमीन/2/26/नअश/प्र.क.127/23-24 दि. 6-7-2023 सदरील आदेशामध्ये मुल्यांकनाच्या 50 टक्के अनार्जित उत्पन्नाच्या रक्कम एक लाख 97 हजार 400 दि.19/6/2023 शासकिय पावती क्र. एमएच 003586002202324 एम अन्वये शासकिय खजिन्यात जमा करून जमेच्या चलनाची प्रत तहसीलदार यांच्या मार्फत सादर केली आहे. व आदेश क्र. जमीन/2/26/नअश/प्र.क.118/23-24 दि. 5-7-2023 सदरील आदेशामध्ये मुल्यांकनाच्या 50 टक्के अनार्जित उत्पन्नाच्या रक्कम एक लाख 31 हजार 600 दि.14/6/2023 शासकिय पावती क्र. एमएच 0035236412202324 एम अन्वये शासकिय खजिन्यात जमा करून जमेच्या चलनाची प्रत तहसीलदार यांच्यामार्फत सादर केली आहे. हे चलन मुक्ताईनगर तहसीलदार यांनी शोधले असता ते दिसून येत नाही, असे लेखी पत्र मुक्ताईनगर तहसीदार यांनी केदार सानप यांना दिले आहे.

शासनाचा लाखोंचा बुडवला नजराणा
या प्रकरणात तत्कालीन तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय (महसूुल) पंकज लोखंडे व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांनी शासनाचा लाखो रूपये नजराणा बुडविल्यामुळे व शासनाची फसवणूक केल्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल करावा व त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ वामन सानप यांनी अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्यासह विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे तक्रार अर्जाद्वारे केली आहे.


कॉपी करू नका.