नेहते शिवारातील गावठी दारूच्या हातभट्ट्या पोलिसांकडून उद्ध्वस्त

0

रावेर : रावेर तालुक्यातील नेहते शिवारात तापी नदीच्या काठावर असलेल्या गावठी दारू हातभट्टी धाड टाकून नष्ट करण्यात आल्या. यावेळी दोन ठिकाणी झालेल्या कारवाई 12 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. याप्रकरणी दोघांविरूध्द वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले.

गोपनीय माहितीवरून कारवाई
रावेर पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या गावठी दारुची हातभट्टी सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यांनी तातडरने पथक तयार करीत कारवाईचे निर्देश दिले. पोलीस पथकाने नेहेते शिवारातील शेतात तापी नदीच्या काठावरील बांधावर मनोज ब्रिजलाल सावळे (नेहते) व राजू अर्जुन कोळी (नेहते) यांच्या गावठी दारूच्या हात भट्टीवर धाड टाकली. 12 हजार पाचशे रुपये किंमतीचे गुळ-मोह मिश्रीत कच्चे रसायन, वेगवेगळ्या पत्री डब्यामध्ये व गावठी हात भट्टीची तयार दारू एका प्लॉस्टिकच्या कॅनमध्ये आढळल्याने हा मुद्देमाल पोलिसांनी जागेवरच नष्ट केला तसेच हातभट्ट्या जागीच उद्ध्वस्त केल्या. याबाबत रावेर पोलिसात कॉन्स्टेबल विशाल पाटील, कॉन्स्टेबल सचिन घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमा प्रमाणे आरोपींविरुद्ध वेगवेगळे गुन्हा नोंद करण्यात आले.

यांच्या पथकाने केली कारवाई
जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, रावेर पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील हवालदार ईश्वर चव्हाण, सचिन घुगे, विशाल पाटील, महेश मोगरे यांच्या पथकाने कारवाई केली.


कॉपी करू नका.