मलकापूर तालुक्याच्या विकासासाठी बांधील : श्रीराम पाटील

महाविकास आघाडीला मताधिक्य मिळणार : आमदार राजेश एकडे

0

मलकापूर : महाविकास आघाडीचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी सोमवारी मलकापूर तालुक्यातील मतदारांच्या भेटी घेतल्या. त्यावेळी मलकापूर तालुक्याच्या विकासासाठी मी बांधील आहे, असे आश्वासन राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी दिले. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला या भागातून मोठे मताधिक्य मिळवून देणार असल्याचे आमदार राजेश एकडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

यांची होती उपस्थिती
श्री धुपेश्वर महादेव मंदिरात प्रचार नारळ फोडून मलकापूर विधानसभा मतदार संघात प्रचाराला सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार गट)जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील, काँग्रेसचे जेष्ठ नेते अरविंद कोलते, एस.एस.मोरे, मलकापूरचे माजी नगराध्यक्ष रशीदखा जमादार, हरिष रावळ, शाम राठी, संतोष रायपूरे, मोहन पाटील, शिवसेना संघटक राजेशसिंग राजपूत, काँग्रेस महिला अध्यक्ष मंगला पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष वनिता पाटील, राजूभाऊ पाटील, रमेशसिंग जाधव, अरुण अग्रवाल, बंडूभाऊ चौधरी, गजानन ठोसर, ईश्वर राहणे (मुक्ताईनगर), अनिल अहुजा, दीपक चाबारे, सोपान शेलकर, लखन कुरेशी, प्रवीण पाटील, अ‍ॅड.बंगाळे, विलास कांडेलकर, यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मतदारसंघातील रणगांव ,भालेगाव , हिंगणा काझी , देवधाबा, खामखेड रेल्वे मोरखेडा बुद्रुक ,मोरखेडा खुर्द वरखेड, उमाळी या गावांना भेटी देत मतदारांशी संवाद साधला.

विकासासाठी मी बांधील : श्रीराम पाटील
आपल्या भागातील विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असेल आपणास पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही. विश्वास ही सर्वात मोठी माझी प्रॉपर्टी आहे. आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही व आता ही उमेदवारी माझी राहिली नसून ही जनतेने हातात घेतली आहे. र्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करेल. केंद्रीय स्तरावरील योजना विधानसभा मतदारसंघात पोहोचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल, असे श्रीराम पाटील यांनी मतदारांशी बोलताना सांगितले.

 


कॉपी करू नका.