साकेगावातून आठ महिन्यांच्या बाळाची चोरी : नंदुरबारच्या पोलिसासह पाच जणांची टोळी जाळ्यात

अटकेतील आरोपींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे : गुन्हे उघडकीस येण्याची आशा

0

Theft of an eight-month-old baby from Sakegaon : A gang of five including Nandurbar police in the net भुसावळ : भुसावळ तालुक्यातील साकेगाव गावातून गरीब कुटूंबातील आठ महिन्यांचे बाळ चोरून नेण्यात आले होते. ही घटना 23 एप्रिल रोजी रात्री घडली होती. पोलिसांनी तपासात तब्बत पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अटकेतील आरोपींमध्ये नंदुरबारच्या पोलिसासह ट्रस्टच्या संचालिकेसह गुन्हेगारांचा समावेश आहे. याबाबतची माहिती जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जळगावात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली.

या आरोपींना अटक
दीपक रमेश परदेशी, (32, रा.नारायण नगर, घोडेपीर बाबा दर्गाजवळ, मोरया हॉलच्या समोर, शिवपूर कन्हाळा रोड, भुसावळ), अमित नारायण परिहार (30, रा. नागसेन कॉलनी, कंडारी, ता.भुसावळ), कुणाल बाळू वाघ (19, रा.शिंगारबडी, साकेगाव, ता.भुसावळ), बाळू पांडुरंग इंगळे (51, रा.ऑर्डनन्स फॅक्टरी, वरणगाव, सुशील नगर, दर्यापूर शिवार, ता. भुसावळ), रिना राजेंद कदम (48, रा. नारायण नगर, घोडेपीर बाबा दर्गाजवळ, मोरया हॉलच्या समोर, शिवपुर कन्हाळा रोड, भुसावळ) या आरोपींना अटक करण्यात आली.

असे आहे प्रकरण
साकेगाव येथून 23 एप्रिल रोजी रात्री 1.30 ते 2 वाजता घरात दोन अनोळखी व्यक्तींनी प्रवेश करुन पाळण्यात झोपलेले आठ महिन्यांचे अल्पवयीन बाळ चोरून नेले होते. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नंदुरबारातील पोलिसाचे भुसावळ कनेक्शन अन बाळ ताब्यात
मुंबई येथील महिलेला मूलबाळ होत नसल्याने तिने भुसावळ येथील अलका जीवन स्पर्श फाउंडेशनच्या रीना कदम हिच्याशी संपर्क साधला होता. त्यांना मुलगा दत्तक घ्यायचा होता. याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार अलका जीवन स्पर्श फांउडेशनमध्ये पोलिसांनी छापा टाकून साकेगावातून चोरलेले बाळ ताब्यात घेतले. हे बालक पोलिसांनी साकेगावातील पालकांच्या स्वाधीन केले आहे. या गुन्ह्यात आरोपी बाळू इंगळे याचा सहभाग आढळला असून तो नंदुरबारमधील बिनतारी संदेश विभागामध्ये पोलीस हवालदार या पदावर कार्यरत आहेत तर रीना कदम या महिलेसोबत त्याची जवळीक असल्याची माहिती आहे.

पोलिसांनी उलगडले गणित
आरोपींनी दोन अल्पवयीनांच्या मदतीने साकेगावातून बाळ चोरले व नंतर ते मुंबईत स्वीप्ट गाडीने नेले. या कामात दीपक परदेशीची मदत झाली तर अन्य आरोपींनी या गुन्ह्याकामी सहकार्य केले. अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध यापूर्वी खून, खंडणी, जबरी चोरी, घरफोडी, मारामारी, चोरी व आर्म अ‍ॅक्ट प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

यांनी उघडकीस आणला गुन्हा
हा गुन्हा भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील, भुसावळ तालुक्याचे निरीक्षक बबन जगताप, भुसावळ तालुक्याचे एपीआय विशाल पाटील, हवालदार विठ्ठल फुसे, युनूस शेख, प्रेमचंद सपकाळे, वाल्मीक सोनवणे, दिलीप जाधव, संजय भोई, संजय तायडे, नितीन चौधरी, जगदीश भोई, राहुल महाजन, सादीक शेख, उमाकांत पाटील, रमण सुरळकर, योगेश माळी, प्रशांत परदेशी, योगेश माळी, अमर आढाळे, राहुल भोई आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.