लोकसभा निवडणुकीचे माघारीनंतर चित्र स्पष्ट : जळगावात 14 तर रावेरात 24 उमेदवार रिंगणात

माघारीच्या दिवशी जळगावात सहा तर रावेरातून पाच उमेदवारांनी घेतली माघार

0

After the withdrawal of the Lok Sabha elections, the picture is clear : 14 candidates in Jalgaon and 24 candidates in Raver जळगाव : जळगावसह रावेर लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी माघारीचा अंतीम दिवस असल्याने या निवडणुकीत कोण-कोण माघार घेते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. माघारीच्या अंतिम दिवशी जळगाव लोकसभा मतदारसंघात सहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली तर रावेरातून पाच अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली. जळगाव लोकसभेत आता 14 तर रावेरात 24 उमेदवार हे निवडणूक रिंगणात आहेत.

जळगावात 14 उमेदवार रिंगणात
सध्या जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला आहे. 13 मे रोजी जळगाव आणि रावेरमधील निवडणूक पार पडणार आहे. जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना अर्ज माघारी घेण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. माघारीच्या अंतिम दिवशी जळगावमधून सहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली आहे. यानंतर आता जळगाव लोकसभेत भाजपच्या स्मिताताई वाघ, शिवसेना ठाकरे गटाचे करण पवार यांच्यासह एकूण 14 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

रावेरात 24 उमेदवार रिंगणात
जळगाव लोकसभेतून संजय एकनाथ माळी, रोहित दिलीप निकम, लक्ष्मण गंगाराम पाटील, डॉ.प्रमोद हेमराज पाटील, संग्रामसिंह सुरेश सूर्यवंशी व प्रदीप शंकर आव्हाड या अपक्ष सहा उमेदवारांनी माघार घेतली आहे.

दुसरीकडे रावेर लोकसभेमधून पाच उमेदवारांनी माघारी घेतली आहे. यामुळे आता येथून भाजप उमेदवार रक्षा खडसे, महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील व वंचित बहुजन आघाडीचे संजय ब्राह्मणे यांच्यासह एकूण 24 उमेदवार हे निवडणूक रिंगणात आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघातून शेख रहुब युसुफ, राहुल रॉय, अशोक मूळे, नितीन प्रल्हाद कांडेलकर, शेख कुर्बान शेख करीम नाजमीन शेख रमजान या पाच अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली आहे.


कॉपी करू नका.