एकनाथ खडसेंच्या भाजपा प्रवेशावर विनोद तावडेंचे मोठे वक्तव्य….!

0

Vinod Tawde’s big statement on Eknath Khadse’s BJP entry….! पुणे : राष्ट्रवादीतून भाजपाच्या वाटेवर असलेले ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांचा अद्याप भाजपात प्रवेश झाला नसल्याने राजकीय वर्तुळात विविधांगी चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पुण्यात मोठे वक्तव्य केले आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, भाजपमध्ये एकनाथ खडसे यांचा लवकरच प्रवेश होणार अहे शिवाय खडसे यांच्या प्रवेशाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा विरोध नाही, असे त्यांनी स्पष्ट करून अनेक चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

फडणवीस सुडाचे राजकारण करीत नाहीत
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापात तावडे म्हणाले, की उद्धवसेनेने युती करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मते मागितली; पण निवडून आल्यानंतर आमच्याशी गद्दारी केली. त्यांना धडा शिकवला आहे. देवेंद्र फडणवीस सुडाचे राजकारण करत नाहीत.

काँग्रेस काळात राज्य घटनेत 80 वेळा बदल
तावडे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यांत झालेल्या मतदानाची टक्केवारी मागील निवडणुकीप्रमाणेच असून काँग्रेसची देशात सत्ता असताना राज्यघटनेत 80 वेळा बदल करण्यात आले. राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. त्यापैकी महायुतीला 40 जागा मिळतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. आम्ही केवळ मतांसाठी जाहीरनामा काढत नाही. आमच्याकडे व्हिजन आहे, असे तावडे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

लोकसभा निवडणुकीनंतर खडसेंचा प्रवेश !
ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांचा भाजपात प्रवेश नेमका कधी? या विषयी तारखेबाबत स्पष्टता नसलीतरी लोकसभा निवडणुका आटोपल्यानंतर खडसे दिल्लीत पक्ष प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. अलीकडचे आमदार खडसेंनी भाजपा हे आपले घर असल्याचे व त्याचा पाया आपण बांधल्याचे सांगितले होते. स्वःघरात आपण वापसी करीत असल्याचेही त्यांनी सांगितले होते.


कॉपी करू नका.