न्हावी गावातून डीजेच्या वाहनातून 73 हजाराांचे म्युझिक मिक्सर अॅम्प्लिफायर लांबवले
यावल : यावल तालुक्यातील न्हावी या गावात मारूळ रोडवरील जुन्या सरकारी दवाखान्याजवळ रुद्राक्ष नामक डीजेच वाहनातून चोरट्याने 83 हजार रुपये किंमतीचे म्युझिक मिक्सर अॅम्प्लिफायर चोरी केले. फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
न्हावी, ता.यावल या गावात मारूळ रोडावर जुना सरकारी दवाखाना आहे. या ठिकाणी विक्रम वामन तायडे (आंबेडकर नगर, न्हावी) यांनी आपली रुद्राक्ष डीजेची गाडी लावली होती. त्यांच्या या डीजेच्या वाहनातील 83 हजार रुपये किंमतीचे म्युझिक मिक्सर अॅम्प्लीफायर अज्ञात चोरट्याने चोरी केले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर विक्रम तायडे यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार देविदास सुरदास करीत आहे.
