पक्षाविरोधात जाणार्‍यांवर हवी कारवाई : अ‍ॅड.रवींद्र पाटलांचा खडसेंचे नाव न घेता टोला

मुक्ताईनगरात आमदार खडसेंबाबत शरद पवारांसह जयंत पाटलांचे मौन

0

Action needed against those who go against the party: Adv. Ravindra Patal’s attack without naming Khadse मुक्ताईनगर : ज्यांना पडत्या काळात पक्षाने मदत केली ते पक्ष सोडून भाजपा जाण्याचा प्रयत्न करीत आहे यापुढे असे नेता असो क कार्यकर्ता त्यांनी पक्ष विरोधी कारवाई केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांनी आमदार खडसेंचे नाव न घेता लगावला. त्यांच्या या वक्तव्यावर पक्षाध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मौन पाळले. महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी मुक्ताईनगरात सायंकाळी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

अ‍ॅड.रोहिणी म्हणाल्या : पक्षात राहणार सांभाळून घ्या
अ‍ॅड.रोहिणी खडसे म्हणाल्या की, आज मला या पक्षात मला थांबायचे आहे कारण मला या पक्षाचे नेतृत्व ध्येयधोरण आवडतात त्यामुळे आम्हाला ज्या परिस्थितीत पवार साहेबांनी साथ दिली, सांभाळून घेतले त्याबद्दल ऋणी आहोता. मी कधीही विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, भविष्यात याच पक्षात काम करील करीत राहील व मुक्ताईनगरमधून रावेर लोकसभा निवडणुकीत पक्षाला लीड मिळवून देईल, अशी ग्वाही राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी दिली.

भाजपाला धडा शिकवण्याची हीच वेळ
मुक्ताईनगरात रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांच्या प्रचारार्थ क्रीडा संकुलात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. दिल्लीपुढे झुकायचे नाही, महाराष्ट्रात 48 पैकी 35 जागा निवडून येतील. दहा वर्षांपूर्वीचा देश अधोगतीकडे चालल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. अग्निवीर योजना ही बोगस योजना असून आमचे सरकार आल्यावर ती बंद करू, शेतकर्‍यांच्या प्रत्येक अवजारांवर जीएसटी लावण्याचा षडयंत्र केंद्र सरकारने केले आहे. सर्व भ्रष्टाचार्‍यांना गोळा करून पक्षात सामील करून घेतले आहे. अशा पक्षाला जनतेने धडा शिकवला पाहिजे, असे प्रतिपादन प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी केले. सरकार संविधान बदलण्याचे षडयंत्र करीत असल्याचे अरुणभाई गुजराथी यांनी सांगितले.

यांची विचार मंचावर उपस्थिती
प्रसंगी माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री सतीश अण्णा पाटिल, आमदार शिरीष चौधरी, आमदार राजेश एकडे, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, उमेदवार श्रीराम पाटील, जिल्हा निरीक्षक प्रसेन्नजीत पाटील, राजा राजापूरकर, संतोष रायपुरे, माजी आमदार अरुण पाटील, संतोष चौधरी, कैलास पाटील, दिलीप सोनवणे, भीम आर्मीचे अध्यक्ष जगन सोनवणे, वंदना चौधरी, प्रतिभा शिंदे, विनोद तराळ, डॉ.जगदीश पाटील, डॉ.अरविंद कोलते, ईश्वर रहाणे, निवृत्ती पाटील, सोपान पाटील, यु.डी.पाटील, एजाज मलिक, आबा पाटील, किशोर पाटील, दिनेश पाटील, पवन पाटील, दीपक पाटील, अजय बढे, विकास पाटील, संजय पाटील, डॉ.बी.सी.महाजन यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उबाठा) संयुक्त महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित हा


कॉपी करू नका.