भुसावळात खंडणीसाठी दोघा भावंडांवर प्राणघातक हल्ला : दाम्पत्याविरोधात गुन्हा

0

Assault on two siblings for extortion in Bhusawal : Crime against the couple भुसावळ : भुसावळातील रेल्वे कंत्राटदारासह त्याच्या भावावर विळ्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना शुक्रवार, 3 मे रोजी सकाळी 9 वाजता न्यू सातारा भागातील ओमकारेश्वर मंदिराजवळ घडली. याप्रकरणी रात्री 10 वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी पतीला अटक करण्यात आली असून त्यास न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

खंडणीसाठी हल्ला : चैनही हिसकावली
रुपेश रवींद्र कानोजे (32, ओंकारेश्वर मंदिर, भुसावळ) हा तरुण त्यांचा भाऊ सुरज कानोजे यांच्यासोबत वास्तव्याला असून तो रेल्वे कॉन्ट्रॅक्टर आहे. शुक्रवार, 3 मे रोजी सकाळी 9 वाजता त्याच परिसरातील पवान कृष्णा मायकल आणि मीनाक्षी पवन मायकल हे दोघं रुपेश कानोजे यांच्या घराजवळ आल्यानंतर त्यांनी खंडणीची मागणी केली. त्याला विरोध केल्यानंतर पवन मायकल आणि मीनाक्षी मायकल या दोघांनी लोखंडी विळ्याने रुपेश व त्याचा भाऊ सुरज यांच्यावर वार करत जखमी केले. रुपेशच्या गळ्यातील 12 ग्रॅम वजनाची 70 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन जबरी हिसकावण्यात आली.

या प्रकरणी शुक्रवारी रात्री 10 वाजता भुसावळ शहर पोलिसात पवन कृष्णा मायकल आणि मीनाक्षी पवन मायकल (दोन्ही रा.ओमकारेश्वर मंदिर, जवळ भुसावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी पवन मायकल यास शुक्रवारी अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तपास पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय कंखरे करीत आहे.


कॉपी करू नका.