जळगावात बनावट दारुचा कारखाना उद्ध्वस्त : 75 लाखांचा मुद्देमाल जप्त : पाच आरोपींना अटक

0

Counterfeit liquor factory destroyed in Jalgaon : 75 lakh worth of goods seized: Five accused arrested जळगाव : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवार, 4 मे 2024 रोजी एमआयडीसी भागातील के-10 सेक्टर मधील मंदार आयुर्वेदिक प्रोडक्ट या कंपनीत मारलेल्या छाप्यात बनावट देशी दारुचा कारखाना उध्वस्त केला. 75 लक्ष 64 हजार 200 रुपये किमंतीचा मुद्दामाल हस्तगत करण्यात आला असून पाच आरोपींना अटक करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध व बनावट दारु विक्री व निर्मितीवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले होते. त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत जिल्हाभर वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून कारवाया सुररू आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक डी.एम. चकोर यांच्या पथकास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शनिवार, 4 मे , 2024 रोजी मध्यरात्री 2.30 वाजेसुमारस एमआयडीसी भागातील के-10 सेक्टर मधील मंदार आयुर्वेदिक प्रोडक्ट या कंपनीत छापा मारला असता शितपेयाच्या नावाखाली अवैधरित्या बनावट देशी दारु कारखाना सुरू असल्याचे व रॉकेट संत्रा नामक मद्याची अवैधरित्या निर्मिती करून ती बाटलीत भरली जात असल्याचे स्पष्ट झाले. एकूण पाच आरोपीना अटक करण्यात आली .

75 लाखांचा मुद्देमाल जप्त
आरोपींकडील 15 लाख 75 हजार किमंतीच्या 45 हजार सिलबंद रॉकेट संत्रा मद्याच्या बाटल्या, 30 लाख 30 हजार किमंतीच्या देशी मद्याचे भरलेले बॅरल, 3 लाख किमंतीच्या 1 लाख रिकाम्या बाटल्या, 6 लाख किंमतीचे लेबल पट्टी मशिन, 6 लाख किंमतीचे बुच सिल बंद करण्याचे मशिन, 5 लाख रुपये किंमतीचे पाणी शुद्धीकरण मशिन, 4 लाख 50 हजार किंमतीचे चार चाकी वाहन यासह किरकोळ व इतर साहित्य असा एकूण 75 लाख 64 हजार 200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई राज्य उत्पादक शुक्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी, प्रसाद सुर्वे, उपआयुक्त उषा वर्मा, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अधीक्षक डॉ.व्ही.टी. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक डी.एम.चकोर, एस.बी.चव्हाणके, दुय्यम निरीक्षक एस.बी.भगत, सी.आर.शिंदे, राजेश सोनार, विठ्ठल बाविस्कर, गिरीष पाटील, सुरेश मोरे, पी.पी.तायडे, दिनेश पाटील, गोकुळ आहिरे, धनसिंग पावरा, एस.आर.माळी, विपुल राजपुत, आर.टी.सोनवणे, व्ही.डी.हटकर, एम.एम.मोहिते, आर.डी. जंजाळे, नंदू पवार यांच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.