वादळाने क्षणात मातीचे घर कोसळले : थोरपाणी आदिवाणी पाड्यावर चौघा मृतांवर अंत्यसंस्कार
सुदैवाने आठ वर्षीय बालक बचावला : पावरा कुटूंबाला मदतीची प्रतीक्षा

A mud house collapsed in an instant after the storm: Four dead cremated at Thorpani Advani Pada यावल : यावल तालुक्यात रविवारी सायंकाळी वादळी वार्यासह झालेल्या पावसाने सातपुड्याच्या कुशीत वाघझिरा गावापासून सातपुड्याच्या जंगलात असलेल्या थोरपाणी या आदिवासी पाड्यावरील घर कोसळले. या घटनेत एकाच कुटूंबातील चार जण जागीच दगावले तर या कुटुंबातील दहा वर्षाचा बालक हा बचावला आहे. घटनेची माहिती मिळताच रात्री तहसीलदार व पोलीस निरीक्षक हे घटनास्थळी पथकासह रवाना झाले. दरम्यान, सोमवारी या घटनेतील मृतांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू
रविवारी सायंकाळी वादळी वार्यासह यावल तालुक्यात पाऊस झाला यात तालुक्यातील पश्चिम भागात वाघझिरा या गावापासून सातपुड्याच्या कुशीत असलेल्या थोरपाणी या आदिवासी पाड्यावर प्रचंड वादळ आल्याने वादळामध्ये नानसिंग गुलाब पावरा (28) यांचे घर कोसळले. या घरात नानसिंग पावरा सह त्यांच्या 26 वर्षीय पत्नी, तीन वर्षीय मुलगा व दोन वर्षीय मुलगा हे चार जण दगावले. या घटनेत पावरा कुटूंबाचा 10 वर्षीय मुलगा बचावला.
या घटनेची माहिती वाघझिरा गावात देण्यात आली. पंचायत समितीचे माजी उपसभापती भारसिंग बारेला यांनी प्रशासनाला माहिती कळवली.