तांब्याची वायर विक्रीचे आमिष दाखवत लाखोंचा गंडा : तीन आरोपींना निजामपूर पोलिसांकडून अटक

0

साक्री : तांब्याची वायर विक्रीचे आमिष दाखवत लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार समारे आल्यानंतर निजामपूर पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली. साक्री तालुक्यातील निजामपूर परिसरात फसवणुकीची घटना घडल्यानंतर खळबळ उडाली होती. अमीत तानाजी नाईक (रा.ऐरोली, नवी मुंबई), अनुप ऊर्फ राज मुन्नालाल शर्मा (रा.उमीयानगर, सुरत) ज्ञानेश्वर धर्मा पाटील (रा.अर्थे, ता.शिरपूर) अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत. संशयीतांच्या ताब्यातून 13 लाख 50 हजार, चार मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.

24 तासात तीन आरोपी जाळ्यात
हरीष सुजेश पवार (56) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार साक्री तालुक्यातील जामदा येथील इक्बाल चव्हाण व नवी मुंबईतील अमित नाईक यांनी विश्वासात घेत त्यांना 44 टन तांब्याची वायर विक्री करायची आहे असे सांगितले. तसेच साक्री तालुक्यातील पेटले गाव शिवारातील सुझलॉन कंपनीजवळ ही वायर खरेदी करण्याच्या बहाण्याने बोलावले. त्यानुसार 29 मे रोजी हरिश पवार, सर्वेश सोनाळकर, गायत्री सोनाळकर, नितीन मोरे, हुकुमसिंग, प्रकाशसिंग, महेश निंबाळकर, शिवाजी गुंजाळ, अरुण विश्वकर्मा हे दोन चारचाकी वाहनाने पेटले गाव शिवारात आले.

मारहाण करीत लूटला ऐवज
या वेळी सुझलॉन कंपनीच्या गेटजवळ इक्बाल चव्हाण, अनुप शर्मा, अमित नाईक, ज्ञानेश्वर पाटील, मुकेश येंकी पवार, राजेश शंकीलाल पवार व त्यांच्या सोबत असलेल्या दोन ते तीन जणांनी हरिश पवार व त्यांच्या सहकार्‍यांच्या ताब्यातून 22 लाख 3 हजार रूपये रोख व 2 लाख 55 हजारांची सोन्याची अंगठी, सोन्याची चेन, घड्याळ, एटीएम कार्ड असा एकुण 24 लाख 58 हजारांचा मुद्देमाल मारहाण करुन लुटून नेला.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड, शेख, मालचे, आखाडे आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.