नंदुरबारात भाजपाचे पानीपत : काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयी : हिना गावीत पराभूत


नंदुरबार : राज्याचे लक्ष लागून असलेल्या नंदुरबार लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयी झाले असून भाजपाच्या हिना गावीत येथे पराभूत झाल्या आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री के.सी. पाडवी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी तीनदा उमेदवारी करून हॅटट्रिक पूर्ण केली मात्र तिन्ही वेळेस त्यांना अपयश आले मात्र मुलाने प्रथमच राजकारणात इंट्री करीत यश मिळवले आहे.

भाजपाला मतदारांनी नाकारले
भाजपने डॉ.हिना गावीत यांना तिसर्‍यांदा उमेदवारी दिली होती. तर काँग्रेसने यावेळी राजकीय क्षेत्रात फारसे परिचीत नसलेले गोवाल पाडवी यांना उमेदवारी दिली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 70.68 टक्के मतदान झाले होते. खासदार हिना गावहत यांच्याकडे दहा वर्षाच्या राजकारणाच्या अनुभव तर दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी राहिलेली नसल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे नेते गोवाल पाडवी यांचा विजय झाल्यानंतर पदाधिकार्‍यांनी जल्लोष केला.

वडिलांचे स्वप्न मुलाने केले पूर्ण
विधानसभा निवडणुकीत त्यांनी सात वेळा नाबाद हॅटट्रिक केल्याचा रेकॉर्ड के.सी.पाडवी यांच्या नावावर असलातरी लोकसभेत तीन वेळा ते पराभूत झाले मात्र आता त्यांच्या लोकसभा निवडणुकीतील अपयशी हॅटट्रिकनंतर मुलगा गोवाल पाडवी यांना लोकसभा निवडणुकीत बाजी मारून वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे.

हिना गावीत यांना मतदारांनी नाकारले
लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांसाठी प्रत्येकाची राजकीय किंवा वंशपंरपरेची पार्श्वभूमी पाहावयास मिळते. भाजपचे उमेदवार डॉ.हिना गावीत यांना वडिलांची राजकीय पार्श्वभूमी होती शिवाय त्या स्वतःच त्यांचा कुटुंबातील पहिल्या उच्चशिक्षित डॉक्टर खासदार होत्या मात्र या निवडणुकीत मतदारांनी त्यांना नाकारले आहे.


कॉपी करू नका.