पहूर पोलिसांची मोठी कारवाई : पैठण कारागृहातून पसार झालेला कैदी जाळ्यात


जळगाव : पैठण कारागृहामध्ये शालकाचा खून केल्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेला संशयीत 30 मे रोजी पसार झाला होता. या संशयीताला पहूर पोलिसांनी शुक्रवार, 7 जून रोजी दुपारी 12 वाजता हिवरखेडा येथील राहत्या घरून अटक केली. सुलतान भिकन तडवी (53, रा. हिवरखेडा) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.

खून प्रकरणी संशयीत कारागृहात
जामनेर तालुक्यातील हिवरखेडा या गावांमध्ये 2010 साली सुलतान भिकन तडवी (53, रा.हिवरखेडा) याने पैशांच्या देवाण-घेवाणीच्या कारणावरून त्याचा शालकाचा खून केला होता. त्यानुसार पहुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता. त्यानंतर त्याला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. शिक्षा मिळाल्यानंतर तो संभाजीनगर जिल्ह्यात पैठण कारागृहात शिक्षा भोगत होता.

30 मे रोजी तो पैठण कारागृहातून पळून गेला होता. याबाबत पहूर पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली होती. पहूर पोलिसांनी माहिती काढून तो घरी असल्याचे समजताच त्याच्या घरी जावून शुक्रवार, 7 जून रोजी दुपारी 12 वाजता अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विनोद पाटील, रामचंद्र बोरसे, मनोज दुसाने यांनी केली.


कॉपी करू नका.