खासदार खडसेंचा ग्रामपंचायत सदस्य ते केंद्रीय राज्यमंत्री प्रवास


मुक्ताईनगर : उत्तर महाराष्ट्रातून एकमेव केंद्रीय राज्य मंत्री पदाची संधी मिळालेल्या एकमेव खासदार रक्षाताई खडसे यांचा प्रवास संघर्षमय राहिला आहे. पतीच्या निधनानंतर सासरे एकनाथ खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय धडे गिरवीत त्यांनी ग्रामपंचायत सदस्य ते केंद्रीय राज्य मंत्री पदापर्यंत मजली मारली हे विशेष !

सलग तिसर्‍यांदा झाल्या खासदार
ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आल्यानंतर 2010-2012 पर्यंत कोथळी येथील सरपंचपदी त्या विराजमान राहिल्या तर जिल्हा परिषद सदस्य म्हणून 2012 ते 2014 या कारकिर्दीत त्यांनी काम पाहिले. 1 मे 2013 रोजी निखील खडसे यांनी आत्महत्या केल्यानंतर रक्षा खडसेंवर दुःखाचा डोंगरच कोसळला व त्यानंतर 2014 मध्ये खासदारकीच्या निवडणुकीत त्या विजयी झाल्या. 2019 च्या निवडणुकीतही त्यांनी विजयाची घोडदौड कायम ठेवली व पुन्हा 2024 च्या निवडणुकीत त्या दोन लाख 72 हजारांच्या प्रचंड मताधिक्याने निवडून आल्या.

राजकीय कार्य पुढीलप्रमाणे

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमधील कोथळीच्या सरपंच म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.

जिल्हा परिषद – जळगाव जिल्हा सदस्य आणि अध्यक्ष ( सभापती) आरोग्य विभाग, शिक्षण आणि क्रीडा समिती जिल्हा परिषद, जळगाव,

2014 ते 2019 पर्यंत पहिल्यांदा खासदार

2019 ते 2014 पर्यंत दुसर्‍यांदा खासदार

2024 साली तिसर्‍यांदा खासदार म्हणून निवडून आल्या

 


कॉपी करू नका.