फेकरी शिवारातून 18 हजारांचा धान्य साठा लांबवला

0

भुसावळ : भुसावळ तालुक्यातील फेकरी शिवारातील कृषी संजीवनी शेतकरी गटाच्या कार्यालयातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 18 हजारांचा धान्य साठा लांबवला. चोरीचा प्रकार 6 ते 7 जूनदरम्यान घडला. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
अतुल अशोक कवठे (44, फेकरी, ता.भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार, फेकरी शिवारात दीपनगर हायवे रोडलगत षी संजीवनी शेतकरी गटाच्या कार्यालयातून 14 हजार 850 रुपये किंमतीचा 540 किलो गहू, तीन हजार रुपये किंमतीचे शिलाई मशीन असा एकूण 17 हजार 850 रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला. तपास हवालदार प्रेमचंद सपकाळे करीत आहेत.


कॉपी करू नका.