यावल शेतशिवारात 35 वर्षीय इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला


यावल : यावल शहरातील जलशुद्धीकरण केंद्राागील रहिवासी असलेल्या 35 वर्षीय तरुणाचा शहरालगतच एका शेतात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. जानकीराम शिवदास भील (35) असे मयताचे नाव आहे. रविवारी सकाळी शेतातून दुर्गंधी येत असल्याने ही घटना उघडकीस आली.

यावल पोलिसात नोंद
यावल पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. यावल शहरात नगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या मागे जानकीराम शिवदास भील हा तरुण वास्तव्यास होता. काही दिवसांपासून घरातून तो बेपत्ता झाला होता. रविवार, 9 जून रोजी सकाळी यावल शेतशिवारात किरण चिंधू बोरोले यांच्या शेत गट क्रमांक 1259 मध्ये दुर्गंधी येत असल्याने शेतमजुरांनी शेतात जाऊन पाहिले तर तिथे जानकीराम भील याचा मृतदेह अर्धवट कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला. याबाबत यावल पोलिसांना माहिती देण्यात आली.

घटनास्थळी सहायक फौजदार विजय पासपोळ, हवालदार उमेश सानप, वसीम तडवी, मोहन तायडे हे दाखल झाले व मृतदेह ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदन करून मृतदेह नातलगांना सोपवण्यात आला. याप्रकरणी यावल पोलिसात विश्वनाथ भील यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार उमेश सानप करीत आहे.


कॉपी करू नका.