पाणीपुरीतील खराब बटाट्यामुळे शंभरावर ग्रामस्थांना विषबाधा : चोपडा तालुक्यातील प्रकार


चोपडा : आठवडे बाजारात पाणीपुरी खाल्ल्यानंतर चोपडा तालुक्यातील चांदसणी, कमळगाव, पिंप्री येथील सुमारे 110 ग्रामस्थांना विषबाधा झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. त्रास होताच रुग्ण मंगळवारी सायंकाळी अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण दाखल होवू लागल्याने रात्री उशिरा आरोग्य केंद्राला यात्रेचे स्वरुप आहे. दरम्यान, पाणीपुरीतील खराब बटाट्यामुळे हा प्रकार घडल्याचा कयास आहे.

आठवडे बाजारात नागरिकांनी खाल्ली पाणीपुरी
मंगळवार, 18 रोजी कमळगाव येथे आठवडे बाजारात पाणीपुरी विक्रेत्याकडुन ग्रामस्थांनी पाणीपूरी खाल्ली व त्यातील काही जणांना सकाळपासून उलट्या व पोटदुखीचा त्रास होवू लागला. त्यांनी खाजगी रुग्णालयात उपचार करुन घेतले. सायंकाळर्पंत रुग्णांची संख्या 110 वर पोहचली. त्यामुळे रुग्णासह आबालवृध्दांनी अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी केली होती. प्रा.आ.केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांची यामुळे भंबेरी उडाली. खाजगी डॉक्टरही यावेळी प्रा.आ.केंद्रात मदतीसाठी धावुन आले. यातील काहींची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

मंत्री खडसेंकडून आढावा
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी भाजपा जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील यांच्याशी दुरध्वनीद्वारे संपर्क साधून सदर घटनेचा आढावा घेत वैद्यकीय अधिकार्‍यांना तात्काळ योग्य ती उपाय योजना तसेच खबरदारी घेण्याच्या सुचना दिल्या.

दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाकडून नमूने घेण्यात येत असून चौकशीअंती संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सहा.निरीक्षक संतोष चव्हाण म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !