भुसावळ रोटरी रेल सिटीच्या पदग्रहण समारंभ उत्साहात
विशाल शाह, अनिल सहानी यांनी पदभार स्वीकारला
भुसावळ : रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीचा पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी नूतन अध्यक्ष अॅड.विशाल शाह व नुतन सचिव अनिल सहानी यांनी पदभार स्वीकारला. याप्रसंगी रोटरीचे माजी प्रांतपाल संग्रामसिंह भोसले, सहाय्यक प्रांतपाल जी.आर.ठाकुर, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
रोटरी सेवाभावी संस्था
भोसले म्हणाले की, रोटरी ही सेवाभावी संस्था आहे. रोटरीच्या संस्कारातून नातेसंबंध वृध्दींगत होतात. रोटरीअन सत्तेकरीता कधीही काम करीत नाही. रजनी सावकारे म्हणाल्या की, मतदानाची टक्केवारी कमी होणे हे देशासाठी घातक आहे. लोकशाही सुदृढ हवी असेल तर मतदानाची टक्केवारी वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी रोटरीसारख्या सामाजिक संस्थांनी जनजागृतीचे कार्य हाती घ्यावे तसेच शासनाच्या योजनांचा लाभ गरजुंना व्हावा त्यांची आर्थिक पिळवणूक होऊ नये म्हणून मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करावे. जी.आर.ठाकुर यांनी विद्यमान प्रांतपाल राजिंद्र खुराना यांचा संदेश वाचुन दाखवला. मावळते अध्यक्ष मनोज सोनार यांच्याकडून नूतन अध्यक्ष अॅड.विशाल शाह व मावळते सचिव तेजस नवगाळे यांच्याकडून नुतन सचिव अनिल सहानी यांनी पदभार स्वीकारला. सोनार यांनी वर्षभरातील कार्याचा अहवाल सादर केला तर शाह यांनी आगामी उपक्रमांची माहिती दिली. सुयश न्याती व संदीप जोशी यांनी सूत्रसंचलन केले तर हरमीत माखन, सचिन अग्रवाल, रवींद्र चतुर, डॉ.राहुल पांडे, हरविंदरसिंह ठेठी यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.

