जळगावहून तिरुपती, इंदौर व अहमदाबाद विमान सेवेची मागणी

मंत्री रक्षा खडसेंचे नागरी विमान वाहतूक मंत्री राम नायडू यांना निवेदन


मुक्ताईनगर : जळगाव विमानतळावरून तिरुपतीसह इंदौर व अहमदाबादसाठी विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी नवी दिल्ली येथे केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजरापू यांच्याकडे केली. जळगाव विमानतळ येथे आयएफआर-ऑल वेदर ऑपरेशन, लॉ व्हिजीबिलिटी व नाईट लॅण्डींग अश्या स्थानिक विमान वाहतुकीसाठी आवश्यक सर्व सुविधांनी परिपूर्ण असल्याचेही मंत्री खडसे म्हणाल्या

दररोज मुंबई-पुण्यासाठी हवी विमानसेवा
जळगाव विमानतळावरून सद्यस्थितीत मुंबई व पुण्यासाठी आठवड्यातून तीन दिवस विमानसेवा सुरू आहे मात्र प्रवास करणार्‍या व्यापारी व नागरिकांच्या मागणीनुसार त्यांच्या सोयीसाठी तसेच परिसरातील अधिकचे प्रवासी आकर्षित करण्यासाठी पुण्यासाठी संध्याकाळी व मुंबईसाठी सकाळी दररोज विमानसेवा सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीबाबत सकारात्मक दखल घेण्याचे आश्वासन नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजरापू यांनी दिले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !