रोटरी क्लबतर्फे वराडसीम विद्यालयातील विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी

भुसावळ : रोटरी क्लब ऑफ भुसावळतर्फे वराडसीम गावातील पंडीत नेहरू विद्यालयातील विद्यार्थिनींची आरोग्य तासणी करण्यात आली. याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष अनंत पाटील, सेक्रेटरी आरती चौधरी, गजानन ठाकूर, डॉ.माया आर्वीकर, सारंग चौधरी, मदन बोरकर, महेश भराडे, संजय चापोरकर, मंगला पाटील, वैशाली पाटील व प्रकाश ठाकूर आदींची उपस्थिती होती. यावेळी 250 विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करण्यात आली.
यांची शिबिरासल उपस्थिती
प्रसंगी शाळेचे उपाध्यक्ष देविदास हिवरे, चेअरमन अरुण वाणी, सदस्य राजाराम धनपाल, सदस्य भास्कर सपकाळे, पर्यवेक्षिका मीनाक्षी फालक, उपशिक्षक संदीप भंगाळे, मनोहर झांबरे, प्रशांत ढाके, रीतेश भारंबे, शंकर साळुंके, निलेश राजपूत, प्रमोद नारखेडे, विकास तळेले आदींनी परिश्रम घेतले. गोदावरी मेडिकल कॉलेजचे कृनेश गुप्ता, प्राची दहिया, शीतल गावीत, अनिकेत गालफडे, प्रथमेश गव्हाळे, योगेश गायकवाड, मृदुला मुंगसे आदींनी परिश्रम घेतले. आरोग्य तपासणीनंतर विद्यार्थिनींना शारीरिक स्वच्छता व आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थिनींच्या प्रश्नांना डॉ.माया आर्वीकर यांनी उत्तर दिले तसेच थायरॉईड, हिमोग्लोबीन व मासिक पाळी संदर्भात तक्रारी असलेल्या विद्यार्थिनींनाही मार्गदर्शन करण्यात आले.
