अ.भा.आंतर विद्यापीठ मिनीगोल्फ खेळात भुसावळातील नाहाटा महाविद्यालयाला सात पदके
भुसावळ : अ.भा.आंतर विद्यापीठ मिनीगोल्फ खेळात नाहाटा महाविद्यालयाला सात पदके पटकावली. जिमखाना विभागात समारंभात खेळाडूंना गौरवण्यात आले. अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मिनी गोल्फ खेळात सात पदके मिळणार्या संघात हृषीकेश पाटील (सुवर्ण), खेमचंद पाटील (रौप्य), वसीम तडवी (रौप्य), मीनाक्षी सिंग (कांस्य), सरोज चौधरी (कांस्य), यामिनी बाउस्कर (कांस्य) धनुश्री सपकाळे (कांस्य) आणि चेतन सोनवणे (कांस्य) यांचा समावेश होता. 20 खेळाडूंनी विविध खेळांमध्ये अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धांमध्ये सहभागी होऊन उत्कृष्ट कामगिरी केली. तुषार चोरडिया याला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.
पुरस्कार वितरण समारंभात ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक, अध्यक्ष डॉ.महेश फालक, खजिनदार संजय जी.नाहाटा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे उपस्थित होते. खेळाडूंचे मनोबल वाढविण्यासाठी जिमखाना विभागाचे डॉ.एस.के राठोड, डॉ.पी.एच.इंगोले, डॉ.मनोज जाधव, डॉ.उमेश फेगडे, डॉ.संगीता भिरूड उपस्थित होते. या महत्त्वपूर्ण कार्यात महाविद्यालयाचे कार्यालय अधीक्षक भगवान तायडे, डॉ.अख्तर खान, श्याम भारंबे यांनी मोलाची भूमिका बजावली. समन्वयकाची जबाबदारी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.डॉ.आनंद उपाध्याय यांनी घेतली.

