भुसावळातील भोळे महाविद्यालयातील प्राचार्य डॉ.राजू फालक यांचा भारत शिक्षणरत्न पुरस्काराने सन्मान
भुसावळ : भुसावळ पीपल्स चॅरिटेबल संस्थेचे दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयातील प्राचार्य डॉ.राजू फालक यांचा रियल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फाउंडेशन, महाराष्ट्र या संस्थेतर्फे भारत शिक्षणरत्न पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदानाची दखल घेत पुरस्काराचे आयोजन शेगाव येथील मोरोरका कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात करण्यात आले.
ज्येष्ठ सेवानिवृत्त प्राचार्य बी.एस.पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावरचा भारत शिक्षणरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रमुख व्यक्ते रियल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेन्टचे चेअरमन डॉ.प्रमोद पवार होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य बापूसाहेब मनोहर पाटील होते. यावेळी व्यवस्थापन परीषद परिषद सदस्य प्राचार्य रघुनाथ सूर्यवंशी, शेगांव येथील महाविद्यालयाच्या संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर मोरारका उपस्थित होते.

