दहिगाव येथील 45 वर्षीय महिलेला सर्पदंश


यावल (5 ऑगस्ट 2024) : यावल तालुक्यातील दहिगाव येथे शेत-शिवारात शेतात काम करणार्‍या एका 45 वर्षीय महिलेला सर्पदंश झाला. ही घटना शनिवारी सकाळी घडली. तातडीने महिलेला उपचारार्थ यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. या ठिकाणी महिलेवर उपचार सुरू करण्यात आले. महिलेची प्रकृती बिघडत असल्याने तिला तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालयात हलवण्यात आले.

महिलेची प्रकृती गंभीर
दहिगाव गावातील रहिवासी चित्राबाई राजेंद्र पाटील (45) या शनिवारी शेतात काम करीत असताना त्यांच्या डाव्या हाताला अचानक सापाने दंश केला. हा प्रकार निदर्शनास येताच शेतकरी व सहकारी शेतमजुरांनी महिलेला तातडीने उपचारार्थ यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार सोनवणे, डॉ.कमलेश पाटील, डॉ.कोमल नरवाडे, परिचारिका ज्योत्स्ना निंबाळकर, प्रियतमा पाटील यांनी महिलेवर केले मात्र उपचारादरम्यानच महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले. महिलेची प्रकृती सध्या गंभीर आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !