भुसावळ शहरातील आर.ओ.एच. डेपोत एकाच महिन्यात 601 वॅगनची दुरुस्ती


भुसावळ (5 ऑगस्ट 2024) : भुसावळ विभागातील यांत्रिकी विभागांतर्गत आर.ओ.एच. डेपोत जुलै 2024 या महिन्यात डेपोत 601 वॅगनची देखभाल दुरूस्ती करण्यात आली. आतापर्यत डेपोत प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर वॅगनची देखभाल दुरूस्ती करून कर्मचार्‍यांनी एक ऐतीहासिक कामगिरी केली. मे महिन्यात 551 वॅगनची दुरुस्ती केली होती.

डीआरएम ईती पांडे, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता रोहित राजपूत, सहाय्यक विभागीय यांत्रिक अभियंता जी.रमेश आणि सहायक विभागीय यांत्रिक अभियंता सुभाष यादव यांच्या नेतृत्वाखाली विभागाने हे महत्वापूर्ण काम केले आहे. हे यश संपादन करताना आर.ओ.एच. डेपोचे वरिष्ठ विभाग अभियंता रवी कवाडे आणि न्यू सिक सायडिंगचे वरिष्ठ विभाग अभियंता निशिकांत चौधरी यांचे योगदान महत्वपूर्ण राहिले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !