हस्तकला प्रदर्शनातून महिलांच्या हाताला रोजगार : भुसावळात रजनी सावकारे

राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त भुसावळ शहरात प्रदर्शन


भुसावळ : लघू उद्योगांना चालना मिळणे व लघू उद्योजकांच्या वस्तूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या माध्यमातून शहरात राष्ट्रीय हातमाग दिनाचे औचित्य साधून हस्तकला प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले व या माध्यमातून लघू उद्योजकांच्या हातांना रोजगार उपलब्ध करता आल्याचे समाधान असल्याचे मत प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे यांनी येथे व्यक्त केले. शहरातील सुरभी नगरातील आमदारांच्या संपर्क कार्यालयाबाहेर बुधवार, 7 ऑगस्ट रोजी आयोजित हस्तकला प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

12 वर्षांपासून उपक्रम
रजनी सावकारे पुढे म्हणाल्या की, राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त देशभरात भाजपाच्या माध्यमातून उपक्रम राबवला जात आहे. भुसावळातही गेल्या 12 वर्षांपासून आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वात दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो. या माध्यमातून महिलांसाठी शिवणकाम, ब्युटी पार्लर आदी प्रशिक्षण देवून महिलांना आत्मनिर्भर केले जाते व त्यातून त्यांना रोजगाराची उपलब्धता झाली आहे. शनिवार, 10 रोजी भुसावळातील भाजपाच्या मेळाव्यातही महिलांनी प्रदर्शनी लावावी, असे आवाहन त्यांनी केले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
शेतकरी संघाचे ज्ञानदेव झोपे, माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, प्रमोद सावकारे
माजी सरपंच आनंद ठाकरे, तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, माजी नगरसेवक किरण कोलते, राहुल तायडे, समाधान पाटील, पंचायत समितीच्या माजी सभापती मनीषा पाटील, प्रीती पाटील, वंदना उन्हाळे, भाजपा तालुकाध्यक्षा चेतना भिरूड, भाजपाच्या जळगाव जिल्हाध्यक्षा रंजना पाटील, जिल्हा उपाध्यक्ष भारती पाटील, जिल्हा सरचिटणीस अरुणा पाटील, संजय भिरूड, महिला मोर्चा अध्यक्षा अनिता आंबेकर, सरचिटणीस वैशाली सैतवाल आदींची उपस्थिती होती.

स्टॉलमुळे लाभला रोजगार
याप्रसंगी स्टॉल लावणार्‍या लघू उद्योजकांपैकी अनेक महिलांनी मनोगत व्यक्त केले. अल्प वेळेत स्टॉल लावल्यानंतर रोजगाराची संधी उपलब्ध झाल्याने त्यांनी आयोजक रजनी सावकारे व आमदारांचे आभार मानले. प्रदर्शनीत संजना चौधरी, कांचन जोशी, रेखा गडे, पूजा भारंबे, शुभांगी जैन, वंदना सोनार, मीनाक्षी कोल्हे व रीता नाईक आदी महिलांनी स्टॉल लावले. भाजपा कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी दिवसभरात भेटी देत हस्तकलेने बनवलेल्या वस्तूंची खरेदी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !