भुसावळ पालिकेच्या मुख्याधिकारीपदी राजेंद्र फातले : महेश वाघमोडे यांची बदली
महेश वाघमोडे यांची पिंपरी चिंचवड महापालिकेत बदली
Rajendra Fatle as Chief Executive Officer of Bhusawal Municipality : Replacement of Mahesh Waghmode भुसावळ (3 सप्टेंबर 2024) : भुसावळ पालिकेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांची पिंपरी चिंचवड महापालिकेत सहाय्यक आयुक्तपदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी मालेगाव महापालिकेचे राजेंद्र फातले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश शासनाच्या नगर विकास विभागाचे अवर सचिव अ.क.लक्कस यांनी 2 सप्टेंबर 2024 रोजी काढले आहेत.
प्रशासकीय कारणास्तव बदली
पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांची बदली झाल्यानंतर 31 मे 2023 रोजी जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांची भुसावळ पालिकेत बदली करण्यात आली होती मात्र अवघ्या वर्षभरात प्रशासकीय कारणास्तव त्यांची पिंपरी चिंचवड महापालिकेत सहाय्यक आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. वाघमोडे यांच्या कार्यकाळात शहरातील अमृत योजना टप्पा दोनचा महत्वाचा प्रश्न मार्गी लागला तसेच शहर विकासाच्या विविध कामाांनाही त्यांनी प्राधान्य दिले.



