जळगावात धावत्या रिक्षातून महिलेकडील 20 हजारांच्या रोकडसह 40 हजारांचा मुद्देमाल लांबवला


Cash of 20,000 along with 40,000 worth of goods recovered from a woman in a running rickshaw in Jalgaon जळगाव (22 सप्टेंबर 2024) : शिरसोली येथून रिक्षात प्रवास करत असताना महिलेच्या ताब्यातील 20 हजाराची रोकड तसेच 20 हजार किंमतीचे सोन्याचे झुमके असा 40 हजारांचा मुद्देमाल चोरट्याने लांबविला. ही घटना शिरसोली रोड ते बी.जे.मार्केट समोर दरम्यान गुरुवार,19 रोजी घडली.

चोरट्याविरोधात गुन्हा दाखल
नयना सचिन चौधरी (27, रा.रेणुकानगर, मेहरुण) यांच्या आई शिरसोली येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे कार्यक्रमासाठी नयना या गेल्यानंतर परतीच्या प्रवास त्यांनी शिरसोली येथून सुरू केला. बी.जे.मार्केटला जाण्यासाठी रिक्षात त्या बसल्या प्रवासादरम्यान त्यांच्याकडील मुद्देमाल चोरट्याने लांबविला. या प्रकरणी तक्रारीनुसार शुक्रवार, 20 रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास हवालदार गणेश शिरसाळे हे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !