कंपनीची फ्रॅन्चाईसी देण्याच्या आमिषाने जळगावच्या दाम्पत्याला 19 लाखांचा गंडा
19 lakhs extorted from a Jalgaon couple with the lure of giving the franchise of the company जळगाव (26 सप्टेंबर 2024) : कंपनीची फ्रॅन्चाईसी देण्याच्या आमिषाने व त्यातून बक्कळ नफा मिळवून देण्याचे आमीष दाखवत गणेश कॉलनीतील दाम्पत्याची 18 लाख 91 हजार 52 हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. मंगळवार, 24 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात उत्तरप्रदेश नोएडा येथील चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असे आहे फसवणूक प्रकरण
जळगाव शहरातील गणेश कॉलनीत दीपक गोपीचंद नाथांनी (50म हे व्यावसायिक परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा असल्याने ते वर्क फ्रॉम होम पद्धतीने काम ऑनलाईन शोधत होते. त्यावेळी त्यांना एका कंपनीची जाहिरात दिसली. त्यासाठी त्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. त्रिदेव वढेरा उर्फ आकाश अरोरा, निशु गुप्ता, कुणाल शर्मा व मनीष कुमार (सर्व रा.नोएडा, राज्य उत्तर प्रदेश) यांनी त्यांच्या दोन्ही कंपनी एकत्रीतपणे काम करत असल्याचे सांगितले व कंपनीची फ्रॅन्चाईसी देवून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत दीपक नाथाणी व त्यांची पत्नी पत्नी ज्योती दीपक नाथांनी यांच्याकडून बीपीओ कंपनीचे डेटा व्हेरिफिकेशनच्या कामाकरिता करारनामा करून देतो असे सांगितले.
चौघांविरोधात गुन्हा दाखल
चौघांनी डिपॉझिट व सर्व्हरसाठी 18 लाख 91 हजार 52 रुपये रक्कम स्वीकारली. त्यानंतर दीपक नाथाणी यांच्यासोबत कोणतीही करार केला नाही व त्यांना पैसेदेखील परत केले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दांपत्याने मंगळवार, 24 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता जिल्हापेठ पोलिसात दहा घेऊन तक्रार दिल्यावरून त्रिदेव वढेरा उर्फ आकाश अरोरा, निशू गुप्ता, कुणाल शर्मा व मनीष कुमार (सर्व राहणार नोएडा, राज्य उत्तरप्रदेश) या चौघांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख करीत आहेत.