फोन पे वर एक हजारांची लाच मागणार्या चोरवड तलाठ्यासह खाजगी पंटर जळगाव एसीबीच्या जाळ्यात
Private punter Jalgaon in Jalgaon ACB’s net along with Chorwad Talatha who demanded a bribe of Rs 1,000 on phone pay भुसावळ/पारोळा (30 सप्टेंबर 2024) : सातबारा उतार्यावर कर्जाचे बोझे चढवण्यासाठी एक हजारांची लाच मागणार्या पारोळा तालुक्यातील चोरवड येथील तलाठ्यासह खाजगी पंटराला जळगाव एसीबीने लाच मागणीच्या अहवालाअंती अटक केली आहे. या कारवाईने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. सुभाष विठ्ठल वाघमारे (34, ह.मु.बोहरा स्कूल जवळ, वर्धमान नगर, पारोळा) असे तलाठ्याचे तर शरद प्रल्हाद कोळी (43, चोरवड, ता.पारोळा) असे अटकेतील खाजगी पंटराचे नाव आहे.
एक हजारांची मागितली लाच
लोणी बु.॥, ता.पारोळा गावातील 39 वर्षीय तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवली होती. तक्रारदार यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांच्या नावे लोणी बु.॥, ता.पारोळा येथे 6.5 एकर शेतजमीन आहे. या शेत-जमिनीवर तक्रारदार यांना लोणी बु.॥ गावातील वि.का.सो. लि. सहकारी सोसायटीतून कर्ज घेण्यासाठी शेत-जमिनीच्या सातबारा उतार्यावर बोजा चढविणे आवश्यक असल्याने त्यांनी तलाठी सजा चोरवड, ता.पारोळा तलाठी सुभाष वाघमारे यांच्याशी 4 सप्टेंबर 2024 रोजी संपर्क साधत भेट घेतली. यावेळी तलाठ्याने चार सातबारा उतार्याचे आठशे रुपये व कामाचे दोनशे रुपये मिळून एक हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले तसेच आरोपी शरद कोळी याने फोन पे वर लाचेची रक्कम टाकावी म्हणून वारंवार प्रयत्न केला. संशय आल्याने आरोपींनी लाच स्वीकारली नाही मात्र लाच मागणीचा अहवाल येताच सोमवारी संशयीतांना अटक करण्यात आली व त्यांच्याविरोधात पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, महिला हवालदार शैला धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ यांच्या पथकाने केली. या कामी पोलीस सनिरीक्षक स्मिता नवघरे, दिनेशसिंग पाटील, हवालदार रवींद्र घुगे, सुनील वानखेडे, बाळू मराठे, किशोर महाजन, प्रणेश ठाकुर, अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने सहकार्य केले.