अज्ञात वाहनाच्या धडकेने आडगावातील तरुणाचा मृत्यू


The death of a young man from the neighboring village after being hit by an unknown vehicle जळगाव (09 ऑक्टोबर 2024) : काम आटोपून घरी परतणार्‍या आडगाव येथील राजेश पाटील (32) या तरुणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी रात्री 11 वाजता जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावाजवळ घडला. . याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

घरी जाताना गाठले मृत्यूने
यावल तालुक्यातील आडगाव येथेील राजेश पाटील हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. तो जळगावातील एका खाजगी रुग्णालयातील पॅथोलॉजी लॅबमध्ये कामास होता. मंगळवार, 8 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास काम संपवून राजेश हा आपल्या दुचाकीने घरी आडगावला जायला निघाला. जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावापुढे यावलकडून जळगावकडे जाणार्‍या एका अज्ञात वाहनाने राजेशच्या दुचाकीला धडक दिली. त्यात राजेशला गंभीर दुखापत झाली. त्यात राजेशचा जागीच मृत्यू झाला.

जळगाव तालुका पोलिसात मृत्यूची नोंद
ममुराबाद येथील काही तरुणांनी रस्त्याला कडेला पडलेल्या राजेशचा मृतदेह पाहिल्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी राजेशचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आला. तसेच मृतदेहाची ओळख पटल्यानंतर आडगाव येथील पुरुषोत्तम भालेराव या युवकाला अपघात झाल्याचे सांगितले. त्यानंतर रात्रीच राजेशच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली. राजेशच्या पश्चात आई-वडिल, पत्नी, आठ वर्षीय मुलगा, पाच महिन्यांची मुलगी, भाऊ असा परिवार आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


कॉपी करू नका.