टायमर बॉम्बची धमकी : जळगावात हावडा मेलची अडीच तास कसून तपासणी


Timer bomb threat: Two and a half hours thorough inspection of Howrah mail in Jalgaon जळगाव (14 ऑक्टोबर 2024) : डाऊन 12809 हावडा-मुंबई मेलमध्ये टायमर बॉम्ब ठेवल्याचा मेसेज सुरक्षा यंत्रणांना मिळाल्यानंतर सोमवारी पहाटे जळगावात अडीच तास गाडीची कसून तपासणी करण्यात आली मात्र धमकी फेक निघाल्यानंतर गाडी पुढील प्रवासाला रवाना झाली.

ट्वीटरवर संदेश अन् यंत्रणांची धावपळ
मुंबई-हावडा मेल या गाडीमध्ये नाशिकच्या आधी मोठा बॉम्बस्फोट करण्याचा धमकीचा ट्विटर वरून संदेश आल्याने खळबळ उडाली. ट्विटरवरून आलेल्या धमकीच्या मेसेजनंतर जळगाव रेल्वे सुरक्षा बल व बॉम्बशोधक पथकाकडून जळगावरेल्वे स्थानकावर मुंबई-हावडा मेल थांबविण्यात आली. सोमवारी पहाटे 4.17 मिनिटांनी जळगाव रेल्वे स्थानकावर 12809 हावडा-मुंबई मेल ही गाडी येताच रेल्वे सुरक्षा बल व बॉम्ब शोधक पथकाकडून गाडीतील प्रत्येक डब्यात जावून तपासणी करण्यात आली.

दोन तास 17 मिनिटे तपासणी
पूर्ण रेल्वे गाडीच्या तपासणीनंतर 6.28 वाजता रेल्वे पुढच्या प्रवासाला मार्गस्थ करण्यात आली आहे. तब्बल दोन तास 17 मिनिटे गाडीची पूर्ण तपासणी करण्यात आली.

भुसावळ रेल्वे स्थानकावरही तपासणी
भुसावळ जंक्शन स्थानकावर गाडी येताच रेल्वे सुरक्षा बल व जीआरपी पोलिसांकडून पुन्हा गाडीची तपासणी करण्यात आली. त्यानंतर अकोला स्थानकावरही गाडीची तपासणी करण्यात आली. फजलुद्दीन निर्भान याच्या ट्विटर अकाउंटवरून टायमर बॉम्ब लावण्याची माहिती यंत्रणेला मिळाल्यानंतर आता संबंधिताचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !