वृद्धाच्या पिशवीतून एक लाख लांबवले : धरणगावच्या अर्बन बँकेतील प्रकार


धरणगाव (5 नोव्हेंबर 2024) : धरणगाव अर्बन बँकेच्या काउंटरजवळ उभे असलेल्या 70 वर्षीय वृद्ध इसमाच्या पिशवीतून दोन महिलांनी एक लाखांची रोकड लापंबवली. हा प्रकार सोमवार, 4 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री नऊ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

महिलांचा कसून शोध सुरू
आनंदा फकीरा गुजर (70, रा.जांभोरा, ता.धरणगाव) हे वृद्ध आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेती काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. सोमवार, 4 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता ते कामानिमित्ताने धरणगाव शहरातील अर्बन बँकेत आले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्याजवळील दीड लाख रुपयांपैकी 50 हजार रुपयांचा भरणा बँकेत केला व उर्वरित एक लाख रुपयांची रोकड त्यांनी पिशवीत ठेवली. त्यावेळी त्यांच्या मागे उभे असलेल्या दोन अज्ञात महिलांनी त्यांच्या पिशवीतून एक लाखांची रोकड काढून चोरी केली.

दरम्यान, ही घटना घडल्यानंतर आनंदा गुजर यांनी तातडीने नजीकच्या धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री 9 वाजता अज्ञात दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहे.


कॉपी करू नका.