मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा : महाराष्ट्रात संचारबंदी लागू


मुंबई : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतरही बंधने झुगारून नागरीक घराबाहेर पडत असल्याने नागरीकांच्या बेजबाबदार वागण्यामुळे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सायंकाळी पाच वाजता राज्यात संचारबंदी लागू केली आहे. कोरोनाविरुद्धचा लढा गंभीरपणे घ्या. स्वतःच्या आणि दुसर्‍यांच्या आरोग्याशी खेळू नका. 144 कलम लावले आहे त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील. रस्त्यांवर वाहने आणून गर्दी करून कायदा मोडू नका, असे ट्विट उद्धव ठाकरे यांनी ट्विट केलं होतं. त्यानंतर, आता राज्यात संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे.

अत्यावश्यक सेवा राहणार सुरू
मुख्यमंत्री म्हणाले की, ही मौजमजा करण्याची वेळ नाही म्हणून मी राज्यभरात संचारबंदी जाहीर करत आहे. आजपासून आंतरजिल्हा सीमा सील करण्यात येत आहे. ज्या जिल्ह्यात हा विषाणू पोहोचला नाही, त्या जिल्ह्यात हा विषाणू पोहचू नये, हा यामागचा उद्देश आहे, असेही ठाकरेंनी सांगितले. संचारबंदीच्या काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत, हा काळ महत्वाचा असून ही वेळ निघून जाईल, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !