जळगावच्या रायसोनीनगरात बंद घर फोडत 70 हजारांच्या ऐवजावर डल्ला


Gang breaks into closed house in Raisoni Nagar, Jalgaon, gets Rs 70,000 in return जळगाव (10 डिसेंबर 2024) : कुलूपबंद घर हेरणार्‍या चोरट्यांनी रायसोनी नगरातील एका बंद घराला फोडले. बेडरुममधील लोखंडी कपाटातून रोकड, सोने चांदीचे दागिने असा सुमारे 70 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला. घरफोडीचा प्रकार शनिवार, 7 रोजी उघडकीस आला. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे चोरी प्रकरण
आकाश अनिल पाटील (28, रा.रायसोनीनगर प्लॉट नं. 22) हा तरुण आजीसह वास्तव्यास आहे. शुक्रवार, 6 रोजी घराच्या दरवाजाला कुलूप लावून आकाश हा आजीसोबत मामाच्या गावाला गेला होता. शनिवारी सकाळी शेजारील आकाश याच्या मित्राला घराचा दरवाजा उघडा दिसला. तसेच वॉलकंपाउंटचे गेट उघडे दिसले. त्याने तत्काळ ही माहिती आकाश याला दिली. त्यानंतर आकाश जळगावकडे येण्यास निघाला.

पोलिसांची धाव
रायसोनी नगरातील दरवाजाचा कडीकोयडा कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले. बेडरुममधील कपाटाचे लॉक तोडून सामान अस्ताव्यस्त होता. कपाटातीलदोन तोळे वजनाची मंगलपोत, अन्य तीन ते चार दागिने तसेच 10 हजार 500 रुपयांची रोकड असा 70 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला. या प्रकरणी तक्रारीनुसार रविवार, 8 रोजी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ व पोलिसांनी घटनास्थळी जावून माहिती घेतली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !