जळगवात भरधाव वाहनाच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यू


जळगाव (16 डिसेंबर 2024) : जळगावकडून भरधाव वेगातून येणार्‍या अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने पायी चालत जाणार्‍या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार, 13 रोजी पहाटे 3.30 वाजेपूर्वी राष्ट्रीय महामार्गावर रत्नाकर नर्सरी जवळ शहरात घडली. रामचंद्र धनु माळी (वय 57, रा. शांतीनारायणनगर रामेश्वर कॉलनी,मेहरुण जळगाव) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी शनिवार, 14 रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात वाहन चालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला.

असे आहे अपघात प्रकरण
गोपाल माळी (30, रा.शांती नारायणनगर) हे सेंन्ट्रीग काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचे वडील रामचंद्र माळी हे कामानिमित्त शासकीय रुग्णालयात जाण्यासाठी घराबाहेर पडले. रस्त्याने पायी चालत जात असताना भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. त्यांच्या डोक्याला गंभीर इजा होऊन ते जागेवर कोसळले. अपघात झाल्याचे लक्षात आल्यानंतरही वाहन चालक न थांबता वाहनासह पसार झाला. मयताच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी व मुलगा असा परिवार आहे. या प्रकरणी गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले हे करीत आहेत.


कॉपी करू नका.