भुसावळात काँग्रेसतर्फे ईव्हीएमविरोधात स्वाक्षरी अभियान
भुसावळ (18 डिसेंबर 2024) : ईव्हीएम हटाओ संविधान बचावो स्वाक्षरी मोहिमेचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीतील श्रेष्ठींच्या आदेशाने शहरात मंगळवार, 17 रोजी शहरातील विविध भागात भुसावळ काँग्रेस कमेटीतर्फे आयोजन करण्यात आले.
शेकडो नागरिकांचा सहभाग
काँग्रेस पक्ष श्रेष्ठींच्या आदेशाने राज्यात ईव्हीएम हटाओ, संविधान बचावो स्वाक्षरी मोहिम राबवण्यात आली. मंगळवारी दुपारी 12 वाजता रेल्वे स्टेशनजवळील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ मोहिम राबवण्यात आली. माजी आमदार नीळकंठ फालक, रावेर लोकसभा जिल्हा कार्याध्यक्ष भगतसिंह पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्यांक विभागाचे मो.मुनव्वर यांनी स्वतः स्वाक्षरी करीत अभियानाला सुरूवात केली. पाचशेवर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील विविध भागात सप्ताहभर स्वाक्षरी अभियान सुरू राहणार आहे.
यांची होती उपस्थिती
वंचित आघाडीचे संजय ब्राह्मणे, युवक काँग्रेसचे ईम्रान खान, जगपाल सिंह गील, सेवादलाचे संजय खडसे, इंटकचे विलास खरात, महिला काँग्रेसच्या यास्मीन बानो, राणी खरात, वंदना चव्हाण, राष्ट्रवादीच्या संगीता भामरे, असगर शेख, फिरोज खान, नरेंद्र मस्के, सलीम पटेल, रहिम शेख, एजाज भाई, अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.