भुसावळात देविदास फालक वृद्धाश्रमाचा प्रारंभ
गरजूंना संपर्काचे आवाहन : त्रिपदी मंडळातर्फे भजनांचे सादरीकरण
भुसावळ (28 डिसेंबर 2024) : शहरातील जामनेर रोडवरील मीरगव्हाण क्षेत्रात स्वा.सावरकर मध्यवर्ती राष्ट्रीय प्रबोधन संस्था संचलित कै.देविदास फालक वानप्रस्थाश्रम तथा वृद्धाश्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. 24 रोजी श्री दत्तयाग व 25 वास्तुशांती तसेच प.पू.नाना महाराज तराणेकर त्रिपदी मंडळाच्या वतीने त्रिपदी भजनांचा कार्यक्रम झाला.
यांची होती उपस्थिती
यावेळी संस्थेचे देणगीदार देवदत्त पेंडसे (नागपूर), माधवी संत (नाशिक), देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ जळगावचे विश्वासराव कुळकर्णी, विलासराव देशमुख, नंदकुमार जाखोटिया, संस्थेचे अध्यक्ष महेश फालक उपस्थित होते. संस्था सचिव गणेश वढवेकर यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या विविध सेवा प्रकल्पांची माहिती दिली.वृद्धाश्रमात गरजू व्यक्तींना सशुल्क नियमानुसार प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गरजू ज्येष्ठ नागरिकांनी वृद्धाश्रमात प्रवेश घेण्यासाठी संपर्क करावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले.

यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
धार्मिक विधीचे पौरोहित्य पावडे गुरुजी व सहकार्यांनी केले. यावेळी अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघाचे विलासराव बेंद्रे, मोतीराम गिरनारे, प्रद्युम्न गाडगीळ, श्रीराम मंदिराच्या सरीता चौक, त्रिपदी मंडळाच्या सरीता देशपांडे, रवी जोशी आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी महेंद्र गोडबोले, चंद्रकांत नेवे, राजेश कोष्टी, संजय बोचरे, प्रणव वढवेकर, संजय एकलारकर, यशोधन फालक, लक्ष्मी वढवेकर, वैशाली एकलारकर, प्रतिभा वढवेकर, नेवे, बोचरे, मृणाल गाडगीळ यांनी परिश्रम घेतले.




