भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बहुविषयक उपयोगावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्र
भुसावळ (मंगळवार, 22 सप्टेंबर 2026) : शहरातील भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बहुविषयक उपयोगावरील आंतरराष्ट्रीय परिसंवाद या विषयावर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन मंगळवार, 22 सप्टेंबर 2026 रोजी करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक होते. यावेळी संस्थेचे चेअरमन महेश फालक, संस्थेचे सचिव विष्णूभाऊ चौधरी, संस्थेचे कोषाध्यक्ष संजयकुमार नाहाटा यांनी कार्यक्रमाला फोन द्वारे शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ.बी.एच.बर्हाटे, उपप्राचार्य प्रा.डॉ.जी.आर.वाणी, उपप्राचार्य प्रा.डॉ.डी. एन.पाटील, कानिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.वाय.एम.पाटील, फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे विभागप्रमुख डॉ.चंद्रकांत सरोदे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
भविष्यातील संधींसाठी विद्यार्थ्यांनी तयार रहावे
व्याख्याते प्रा.डॉ.दयाघन एस.राणे व हर्षाराणी बर्हाटे (ऑस्ट्रेलिया) यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बहुविषयक उपयोगावरील आंतरराष्ट्रीय परिसंवाद या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षण, विज्ञान, संशोधन, उद्योग, आरोग्य, व्यवसाय, शेती तसेच दैनंदिन जीवनातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापराबाबत त्यांनी माहिती दिली. एआयचा जबाबदारीने, सर्जनशीलतेने आणि प्रभावीपणे वापर करून भविष्यातील संधींसाठी विद्यार्थ्यांनी स्वतःला तयार करावे, असे त्यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य प्रा.डॉ.बी.एच.बर्हाटे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) तंत्रज्ञानाचे विविध क्षेत्रांतील उपयोग, भविष्यातील संधी आणि बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी आवश्यक कौशल्यांविषयी माहिती दिली.
तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करा
अध्यक्षीय मनोगतात डॉ.मोहन फालक यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी पारंपरिक ज्ञानासोबत कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ.चंद्रकांत सरोदे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.विरल वंदन वाणी यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा.स्वाती चौधरी यांनी मानले. यशस्वीतेसाठी डॉ.कोमल सरोदे, प्रा.वैभव पाटील, प्रा.ए.बी.पालवे, प्रा.एच.बी.राजपूत, प्रा.पी.बी.महाजन, प्रा.पी.व्ही.पाटील, प्रा.प्रणिता राणे, पी.एन.सपकाळे, ए.आर.महाजन, एस.डी.तायडे, एस. पी.बावस्कर, जी.आर.चौधरी, एन.आर.पाटील, एम.ए.चौधरी, महाविद्यालयातील सर्व प्राद्यापक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर बंधू भगिनींनी परिश्रम घेतले.




