राजीनामा देणार का ? धनंजय मुंडे यांनी केला हा मोठा दावा ?


मुंबई (2 जानेवारी 2025) : राज्यात गाजत असलेल्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अनेक धक्कादायक दावे झाले मात्र विरोधकांनी आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर मुंडे यांनी प्रथमच भाष्य केले आहे. मी राजीनामा द्यावा तर का द्यावा? याचं काहीतरी कारण तर लागेल. या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आरोपी आहे, ना माझा कुठलाही संबंध आहे. मात्र उगाचच कोणाचातरी राजीनामा मागायचा?, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं.

तर लहान आकाचा होवू शकतो एन्काउंटर
बीडच्या प्रकरणाबाबत बोलताना विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप केला. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो, असं खळबळजनक विधान आज वडेट्टीवार यांनी केला. त्यांच्या या विधानावर धनंजय मुंडे यांनी म्हटलं की, विजय वडेट्टीवार हे बोलायला हुशार आहेत. मात्र, अशा पद्धतीने लहान आका आणि मोठा आका अशी भाषा मी पहिल्यांदाच ऐकतोय. कोणाचा एन्काऊंटर आणि कोणाचं काय? एक तर बीडच्या प्रकरणात पोलीस प्रशासन आणि सीआयडी व्यवस्थित तपास करत आहेत. संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि ज्यांनी ही हत्या केली त्यांच्या विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालवावी आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी त्यामुळे कोणी काय बोलावं? आणि कोणाचं काय होणार? याला काहीही अर्थ नाही. मुळात बीड हत्या प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टात चाललं पाहिजे ही मागणी मी सर्वात पहिल्यांदा केली होती, असं धनंजय मुंडेंनी म्हटलं.


‘म्हणून हा तपास सीआयडीकडे दिलाय’
तुम्ही मंत्री राहिलात तर बीडच्या प्रकरणातील तपासावर दबाव येऊ शकतो, असा आरोप विरोधकांचा आहे त्यामुळे तुम्हाला मंत्रिमंडळातून काढलं जावं, अशी विरोधकांची मागणी आहे. यावर धनंजय मुंडे यांनी म्हटलं की, त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे दिला आहे. या प्रकरणाचा न्यायालयीन तपास देखील होणार आहे. त्यामुळे त्या तपासाशी कोणताही प्रभाव मी मंत्री राहिल्यानंतर होऊ शकत नाही, असं स्पष्टीकरण धनंजय मुंडेंनी दिलं.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !