धुळे एलसीबीची मोठी कारवाई : तीन लाखांच्या गांजासह दोघे जाळ्यात
Major crackdown by Dhule LCB: Two nabbed with ganja worth ₹3 lakh धुळे (गुरुवार, 16 जुलै 2026) : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून तीन लाखांचा सुमारे 12 किलो 100 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. . या कारवाईत दोन संशयितांना अटक करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना आंबेडकर चौक परिसरातील विश्वकर्मा भवनाजवळ काही जण गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने थांबले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून छापा टाकला. या कारवाईत निखील गोकुळ पाटील (25, रा.छोरिया नगर, डी.मार्टजवळ, धुळे) व चेतन जीवन पावरा (21, रा.प्लॉट क्र. 81, सैनिक कॉलनी, नगावबारी, धुळे) यांना ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान आरोपींकडून 12 किलो 100 ग्रॅम वजनाचा व तीन लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला तर गुन्ह्यात वापरलेली 50 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.18 बी.के.0311) जप्त करण्यात आली. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोलीस उपनिरीक्षक अमित माळी, अंमलदार आरीफ पठाण, राहुल सानप, संदीप पाटील, देवेंद्र ठाकूर, अमोल पाटील, सिद्धार्थ निकम आदींच्या पथकाने केली.