सावित्रीमाईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ध्येय साध्य करा : रजनी सावकारे 

भुसावळातील सावित्रीमाईंना जयंतीनिमित्त अभिवादन


Achieve your goals keeping Savitrimai’s ideal in mind : Rajani Savkare भुसावळ (5 जानेवारी 2025) : भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीमाई या समाजातील बहिष्कृत घटकांना शिक्षण देण्यासाठी अग्रेसर होत्या शिवाय मुलींसाठी पहिली शाळा त्यांनी काढल्याने त्यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी केली जाते. आजच्या काळातील स्त्रियांनीदेखील सावित्रीबाईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले ध्येय साध्य करावे, असे प्रतिपादन भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे यांनी येथे व्यक्त केले. शहरातील संजनी पार्कमध्ये मंडळातर्फे सावित्रीमाई फुले यांच्या जयंती कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

असंख्य अडचणींवर केली मात
रजनी सावकारे पुढे म्हणाल्या की, सावित्रीमाईंनी आधी स्वतः आपले पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्याकडून शिक्षण घेत कशा असंख्य अडचणीवर मात करत स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवली. त्या भारतातील पहिल्या शिक्षिका असून त्यांनी मुलींसाठी पुण्यात 1948 शाळा उघडली, असेही त्या म्हणाल्या.


यांची कार्यक्रमास उपस्थिती
सावित्रीमाईंच्या प्रतिमेचे पूजन व प्रतिमेला माल्यार्पण ज्येष्ठ सुशीला वामन सावकारे व झोपे यांनी केले. या कार्यक्रमास प्रतिष्ठा महिला मंडळाच्या सचिव लता सोनवणे, अनिता आंबेकर, मनीषा काकडे, सरला सावकारे, राजश्री बादशाह, सुनंदा भारूडे, रिया पिंपळे, शिवानी पटेल, श्रद्धा चौधरी, आभा दरगड, दिव्या महाजन, स्विटी महाजन, लीना टेकाडे, सोनल महाजन, रीटा नाईक, जया इंगळे, नयना महाजन, चौहान, वंदना सोनार, वैशाली भदाणे, किर्ती पारेख, शोभा पाटील, पवार, तिवारी, यांच्यासह मंडळाच्या सदस्य तसेच परिसरातील नागरिक व महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचालन अनिता आंबेकर यांनी केले. प्रास्ताविकात सरला सावकारे यांनी सावित्रीमाईंच्या जीवन कार्याची माहिती देताना सांगितले की, पुण्यात 1948 मध्ये मुलींसाठी पहिली शाळा उघडण्यात आली त्यावेळी केवळ नऊ मुली शिक्षण घेत होत्या. फातीमा शेख या सहशिक्षिकेच्या मदतीने त्यांनी मुलींना शिक्षीत करीत ज्ञानाची ज्योत पेटवली. सुनंदा भारूडे व तारा चव्हाण यांनी मनोगतात सावित्रीमाईंच्या आयुष्यातील अनेक बाबींवर प्रकाश टाकला.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !