पुण्यातील नारायणगावनजीक भीषण अपघातात नऊ प्रवासी ठार

पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघातात नऊ ठार


Nine passengers killed in a horrific accident near Narayangaon in Pune पुणे (17 जानेवारी 2025) : पुण्यातील नारायणगावजवळून अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिक-पुणे महामार्गावर आयशर टेम्पो, प्रवासी वाहतूक करणारी मॅक्सीमो गाडी आणि एसटीमध्ये झालेल्या विचित्र अपघातात नऊ प्रवासी ठार झाल्याची प्राथमिक माहिती असून या अपघातात 11 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

असा घडला अपघात
महामार्गावर मागून येणार्‍या एका ट्रकने एका कारला धडक दिल्याने हा अपघात झाला आणि नंतर ती बसवर आदळली, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.


अपघातात मॅक्झिमो गाडीचा चक्काचूर झाला. जखमी प्रवाशांवर नारायणगाव मधील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी धाव घेत, जखमींना तात्काळ खासगी आणि शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देखील प्रशासनाकडून देण्यात आली.

पुणे-नाशिक महामार्गावर जात असताना एसटीच्या मागे ही प्रवासी वाहतूक करणारी मॅक्सीमो गाडी जात होती तर त्याच्या पाठीमागून आयशर गाडी प्रवास करत होती मात्र आयशरने जोरात धडक दिल्याने मॅक्सीमो गाडी ही बसवर जाऊन आदळली. दोन्ही गाड्यांच्यामध्ये आल्याने मॅक्सीमो गाडी मधील प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत.

 








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !