भुसावळात श्री गोविंद प्रभू साधना आश्रमाच्या नूतन मंदिराचे भूमिपूजन
मिरची ग्राउंड परिसरातून राजस्थान मार्बलजवळ नव्या जागेत होणासर स्थलांतर
भुसावळ (गुरुवार, 17 सप्टेंबर 2026) : शहरातील मिरची ग्राउंड परिसरात असलेल्या श्री गोविंद प्रभु साधना आश्रम या मंदिराचे राजस्थान मार्बल परिसरात लवकरच स्थलांतर होणार आहे. नव्या जागेवरील मंदिर बांधकामाचा शुभारंभ गुरुवार, 17 सप्टेंबर रोजी प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे यांच्याहस्ते कुदन मारून करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, नगरसेविका सोनाली महाजन यांची उपस्थिती लाभली.
प्रशस्त मंदिराची उभारणी
यावेळी आश्रमाशी संबंधित प.पू. अर्जुनदादा तळेगावकर, तपस्वीनी विमलबाई तळेगावकर, तपस्विनी सोनाली तळेगावकर यांच्यासह साधू मंडळी तसेच पंथीय वासनिक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. नव्या ठिकाणी उभारण्यात येणारे मंदिर अधिक प्रशस्त व सुविधायुक्त असणार असून, भाविकांसाठी धार्मिक उपक्रमांना चालना मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी अर्जुन तळेगावकर, विमल तळेगावकर, सोनाली तळेगावकर आदींची उपस्थिती होती.



