यावल शहरासह ग्रामीण भागातील पाच दिवसांच्या बाप्पाला उद्या निरोप

यावलचा शुक्रवारचा आठवडे बाजार रद्द : पोलिसांचा काटेकोर बंदोबस्त


यावल (गुरुवार, 17 सप्टेंबर 2026)  यावल शहर व तालुक्यातील नायगाव, कोरपावली, डांभुर्णी, दहिगाव आणि सावखेडासीम येथील पाच दिवसाच्या बाप्पाला शुक्रवारी निरोप दिला जाणार आहे. विसर्जन मिरवणुकीची वेळ रात्री 12 वाजेपर्यंत असली तरी शहरातून विसर्जन मिरवणुका लवकर काढण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाचा आहे. शुक्रवारी यावल शहरात भरणारा आठवड्याचा बाजार हा रद्द करण्यात आला आहे.

21 मंडळांनी केली स्थापना
शहरात सार्वजनिक 21 गणेशोत्सव मंडळाच्या वतीने श्रीची उत्साह स्थापना करण्यात आली होती. पाच दिवसांचा गणेशोत्सव शहरात साजरा केला जातो. या अनुषंगाने विविध देखावे, विविध प्रकारच्या सजावटी व विविध प्रकारच्या जनजागृतीपर कार्यक्रम शहरात घेण्यात आले होते. दरम्यान पाच दिवसांच्या बाप्पाचा आता शुक्रवारी निरोप दिला जाणार आहे. सकाळपासूनच घराघरात स्थापित केलेल्या बाप्पांना निरोप दिला जाणार आहे तर मुख्य मिरवणूक ही दुपारी दोन वाजेनंतर सुरू होण्याचा अंदाज आहे




पोलिसांचा काटेकोर बंदोबस्त
फैजपूर डीवायएसपी अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सहायक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे, पोलीस उपनिरीक्षक मैनोद्दीन सय्यद, पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, पोलीस उपनिरीक्षक एम.जे.शेख यांच्या वतीने शहरात व ग्रामीण भागात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

नायगाव, कोरपवली, डांभुर्णी, दहिगाव, सावखेडासिम येथे विसर्जन
यावल शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या नायगाव कोरपावली डांभुर्णी दहिगाव आणि सावखेडासीम येथे देखील पाच दिवसाच्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. या गावातदेखील रात्री 12 वाजेपर्यंतची विसर्जनाची वेळ निर्धारित करण्यात आली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !